‘अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप’

राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप केले जाणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिक - तीन महिन्यांचा अन्न धान्यसाठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधा वाटप दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकरीचे होईल. असे असल्याने धान्य वाटप दुकानदार संघटनांकडून शासनास सांगण्यात आले होते. तसेच केंद्र शासनाने 30 मार्च रोजी मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसात धान्यांची वाहतूक करण्याची मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्याचे धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ दिली आहे.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे धान्य देण्याचा निर्णय 19 मार्च रोजी घेण्यात आला होता. याच दरम्यान केंद्र शासनाकडून 30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते जून 2020 या दरम्यान नियमित धान्यासोबत प्रति महिना प्रति व्यति 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यास राज्य सरकारला सांगण्यात आले होते.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो मोफत तांदूळ देण्याची केंद्र शासनाने सूचना केली. ह्याचा लाभ राज्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात राज्यभरातील 400 व्हॉट्सअ‌ॅप ग्रूपच्या माध्यमातून सर्व रेशनकार्ड धान्य दुकानदारांना याची माहिती देण्यात आली असून सामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही ह्याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे.

2 Responses to “‘अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप’”

  1. Ramdas Bodake

    मध्यमवर्गीय कुटुंबीयांना काय देणार,?

    Reply
  2. Ramdas bodake

    मध्यमवर्गीय कुटुंबीयांना काय मिळणार? खुलासा करावा ही विनंती. तसेच सेवानिवृत्त / दिव्यांग या ना काय देणार?माहिती व्हावी यासाठी परिपत्रके टाकावीत

    Reply

Leave a Reply