
नाशिक:-अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सततच्या वाढत्या गुन्हेगारी घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अंबड औद्याेगिक वसाहतीला स्वतंत्र पोलिस ठाणे द्यावे या मागणीसाठी ८ ऑक्टोबर राेजी नाशिक ते मुंबई असा पायी मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक राकेश दोंदे, सामजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर, रामदास दातीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.अंबड ठाण्याचे विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मितीच्या मागणीचे निवेदन मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे. या निवेदनासाठी २० हजार नागरिकांनी स्वाक्षरी दिली आहे. ८ ऑक्टोबरला सकाळी नऊला कारगिल चौकातून माेर्चा मुंबईकडे प्रस्थान करेल.