अखेर चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त

पुणे:-पुण्यातील चांदणी चौकाचा पूल मध्यरात्री ठीक 1 वाजून 7 मिनिटांनी पाडण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. हा पूल पाडण्यासाठी रात्री 1 वाजता वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाच्या स्ट्रक्चरला 1300 छिद्र पाडून त्यात 600 किलो स्फोटक भरण्यात आली होती. रात्री बारा वाजेनंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. या परिसरात फार रहिवासी इमारती नाहीत. आजूबाजूला असलेले हॉटेल्स रिकामे करण्यात आले होते. सध्या या ठिकाणचा मलबा हटवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. पुण्यातील चांदणी चौकाचा पूल मध्यरात्री ठीक 1 वाजून 7 मिनिटांनी पाडण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. हा पूल पाडण्यासाठी रात्री 1 वाजता वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलाच्या स्ट्रक्चरला 1300 छिद्र पाडून त्यात 600 किलो स्फोटक भरण्यात आली होती. रात्री बारा वाजेनंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. या परिसरात फार रहिवासी इमारती नाहीत. आजूबाजूला असलेली हॉटेल्स मात्र रिकामी करण्यात आली होती. या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले आहे. या पुलाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले पोलादी स्ट्रक्चर मात्र तसेच आहेत. तसेच ज्या -ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आलेली होती, त्या सर्वच्या सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया देखील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या पोकलेनच्या सहाय्याने पूल पाडण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर 50 टक्के पुल कोसळला असून दुसरा ब्लास्ट होणार नाही. त्यामुळे रस्ता रिकामा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, पुण्याहून साताऱ्याकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांनी मला सांगितली होती. मी त्या भागाचा सर्व्हे केला, त्यानंतर एनएचआय, पीडब्लूडी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर तेथे वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता. कंट्रोल ब्लास्टिंगने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. आज तो पूल पाडण्यात आला, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

रात्रीच्या वेळी पोलिसांनी सगळा परिसर निर्मनुष्य केला होता. पुल पाडण्यात आम्ही 100 टक्के यशस्वी झालो आहोत, अशी माहिती उत्कर्ष मेहता एडीफिस इंजिनिअरिंग कंपनीकडून देण्यात आली आहे. ब्लास्ट झाल्यानंतरही पुल पडला नसल्याचं बोललं जात होतं. त्यावर बोलताना कंपनीनं सांगितलं की, आम्ही मुद्दाम काही भाग ब्लास्ट होणार नाहीत यासाठी सोडले होते. या पद्धतीला fragmentation असं म्हणतात जे पद्धत twin टॉवर पाडण्यासाठी वापरण्यात आली होती, त्याला impulsive ब्लास्टिंग असं म्हणले जाते.

Leave a Reply