अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मिलेनिया ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मिलेनिया ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्र्म्प यांनी ट्विट करत सांगितले आहे.आज रात्री आमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही विलगीकरणाची प्रक्रिया आणि उपचार सुरु केले आहेत. आम्ही या लढाईमध्ये एकत्र आहोत, असे ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे.ट्रम्प यांच्या थेट संपर्कात असणारे अधिकारी होप हिक्स यांना कोरोनाची लागण झाल्याचे यापूर्वी गुरुवारी स्पष्ट झाले होते. त्यानंतरच राष्ट्राध्यक्ष आणि प्रथम महिला यांनी विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला होता. खबरदारी म्हणून त्यांनी आपली कोविड चाचणीही केली होती, ज्याचा अहवाल आज प्राप्त झाला.

Leave a Reply