आजपासून लाल किल्ला पर्यटकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत बंद

आजपासून लाल किल्ला 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. पर्यटकांना लाल किल्ल्यात प्रवेश नाही. सुरक्षेच्या दृष्ट्रीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

नवी दिल्ली - देशातील महत्वाच्या ऐतिहासिक इमारतींपैकी एक असलेला ‘लाल किल्ला’ हा फक्त भारतातील नाही तर जगभरातील पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे. परंतु लाखो पर्यटकांचे आकर्षण असणारा लाल किल्ला पर्यटकांसाठी आजपासून 15 ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव पूर्ण होईपर्यंत किल्ला बंद राहील. या संदर्भातील एक आदेश भारतीय पुरातत्व विभागाने जारी केला आहे. सुरक्षेच्या दृष्ट्रीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचार आणि कोरोनामुळे लाल किल्ला जवळपास 5 महिने बंद होता. गेल्या महिन्यात 16 जूनला किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. आता पुन्हा किल्ला बंद करण्यात येत असून 16 जुलैला पर्यटकांसाठी खुला होईल. हा आदेश भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक स्मारक डॉ. एनके पाठक यांनी जारी केला आहे. किल्ला 21 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत बंद राहिल.

लाल किल्ला हा दिल्लीतील एक प्रसिद्ध मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव लाल संगमरवरी दगडावरून पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला गेला. दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किला किंवा लाल किल्ला लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता. या ऐतिहासिक किल्ल्याची 2007 साली युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून निवड केली होती.

भारताच्या इतिहासाशी हा किल्लाचे खोल संबंध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ला हे दिल्ली शहराचे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान देशाच्या लोकांना संबोधित करतात. हे दिल्लीतील सर्वात मोठे स्मारक आहे. या किल्ल्यावर डिसेंबर 2000 मध्ये लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात दोन सैनिक आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply