आसाम:मुसळधार पाऊस, पुराचा 7 लाख लोकांना फटका

मुसळधार पाऊस, पुराचा 7 लाख लोकांना फटका; रस्ते-पूल तुटले, रेल्वे फसली ढिगाऱ्यात

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने रौद्ररूप धारण केले आहे. आतापर्यंत २९ जिल्ह्यांतील ७ लाखांपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. नगांव जिल्ह्यात सर्वात जास्त सुमारे सव्वा तीन लाख लोकांना फटका बसला आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातही पुराचा हाहाकार आहे. दीमा हसाओचे न्यू हाफलांग स्टेशन पूर्ण बुडाले आहे.स्टेशनवर उभी रेल्वे ढिगाऱ्यात फसली आहे. डोंगराळ क्षेत्रात रेल्वे रुळ, पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांना वाचवण्यासाठी लष्कर, निमलष्करी दल, एनडीआरएफ व एसडीआरएफ टीम तैनात आहेत.

Leave a Reply