ईडी आणि एनआयएच्या संयुक्त छापेमारीत पीएफआय संघटनेचा सदस्य असलेला सैफुरेहमान ताब्यात

ईडी आणि एनआयएच्या संयुक्त पथकाच्या छापेमारीत पीएफआय संघटनेचा सदस्य असलेला सैफुरेहमान याला मालेगावच्या हुडको परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

नाशिक : मालेगाव मध्ये ईडी (ED) आणि एनआयएच्या (NIA) संयुक्त पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कुणाला ताब्यात घेतले ? अशी चर्चा सुरू झाली आहे. ईडी आणि एनआयएच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत एकाला अटक केली असून आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ईडी आणि एनआयएच्या संयुक्त पथकाने पहाटेच ही कारवाई केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये मुस्लिम संघटना असलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यांला अटक केली आहे. पहाटे 3 वाजेपासून त्याची चौकशी सुरू असतांना आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

ईडी आणि एनआयएच्या संयुक्त पथकाच्या छापेमारीत पीएफआय संघटनेचा सदस्य असलेला सैफुरेहमान याला मालेगावच्या हुडको परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

सैफुरेहमान हा पीएफआयचा जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती असून संशयित असलेला सैफुरेहमान याला अटक करण्यात आली असून नाशिकमध्ये त्याची कसून चौकशी सुरू आहे.

ईडी आणि एनआयएच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतलेल्या सैफू रेहमान याची नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

सैफु रेहमान याची तपासणी झाल्यानंतर ईडी आणि एनआयएच्या संयुक्त पथक हे रवाना झाले असून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याची चाचपणी सुरू आहे.

मुस्लिम संघटना असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेकडून देशभरात धोका असल्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. देशात कुठलाही घातपात घडू नये यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याच सांगण्यात येत आहे.
वादग्रस्त असलेल्या या संघटनेचे देशभरात तीन लाख फॅमिली अकाऊंट असून या खात्यामध्ये फॅमिली मेंटन्सच्या नावाखाली अनेक देशातून कोट्यवधी रुपये जमा झाल्याचा संशय आहे.

Leave a Reply