एकनाथ शिंदेंच्या जीवाला मोठा धोका,आत्मघातकी स्फोट करून जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची आल्याची धक्कादायक माहिती समोर आली

मुंबई:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. महिनाभरापूर्वीच मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता त्यानंतर गुप्तचर विभागानेच याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी माओवाद्यांनी दिली होती.एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याच बरोबर त्यांच्या ताफ्याला जीवे मारण्याची माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Leave a Reply