
पोलिसांनी या प्रकरणी नऊ आरोपींना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे
हिंगोली :- हिंगोलीच्या औंढा नागनाथ पोलिसांना बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पेट्रोलिंग करत असताना संशय आल्याने पोलिसांनी तपास करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. चौकशी केल्यानंतर तब्बल कोटींपेक्षाही जास्त रकमेच्या बनावट नोटा छापल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
या टोळीतील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून यात एका महिलेचा ही समावेश आहे. या टोळीकडून तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी आपण श्रीमंत असल्याचा बनाव करण्यासाठी बेंटेक्सचे सोने अंगावर घालून फिरत असत. बुधवारी रात्री औंढा शहरातील शासकीय रुग्णालयाजवळ काहीजण आप आपसात भांडत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या बॅगमध्ये पाचशेच्या नोटा आढळल्या.
1 लाख रुपये देऊन त्याबदल्यात बनावट 3 लाख रुपये देत फसवणूक केली जायची अशी या टोळीची कामाची पद्धत होती. या प्रकरणात औंढा येथून 6 जण तर खामगाव येथून तीन असे एकूण नऊ आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीय. आरोपीकडून एक कोटी 14 लाखच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्य आरोपी औरंगाबादचा असल्याचे औंढा नागनाथ असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इतरा आरोपी हे औरंगाबाद, नांदेड, लातूर या भागातील आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.