कर्ज देण्याच्या बहाण्याने 28 जणांची 12 लाखांची फसवणूक, स्वारगेट पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे:-फायनान्स कंपनीच्या माध्यमातून 15 दिवसात तात्काळ कर्ज मंजूर करुन देताे असे सांगुन एका भामटया दांम्पत्याने एकूण 28 जणांची 12 लाख 30 हजार रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आराेपी हेमराज जिवनलाल भावसार, दिपु हेमराज भावसार (रा, पुणे) यांच्यावर स्वारगेट पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडे सागर बाळु मावस (वय 20, रा. गुलटेकडी,पुणे) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 7 जून 2022 ते आजपर्यंत घडलेला आहे. हेमराज भावसार व दिपु भावसार या आराेपी दांम्पत्याने संगनमत करुन मानधन मायक्राे फायनान्स नावाची खाेटी संस्था स्वारगेट परिसरातील रांका हाॅस्पिटल जवळील ताेरणा इमारतीच्या तळमजल्यावर सुरु केली.

नागरिकांना तात्काळ कर्ज मंजूर करुन देऊ असे सांगत त्यांनी लाेकांचा विश्वास संपादन केला. तक्रारदार सागर मावस व त्यांच्या ओळखीच्या एकूण 27 जणांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची हमी आराेपींनी देवून त्यांचे ऑफीस मध्ये सर्वांना बाेलवून 15 दिवसात कर्ज मंजूर करुन पैसे देताे असे सांगितले.

त्याकरिता एकूण 12 लाख 30 हजार रुपये घेऊन काेणत्याही प्रकारचे कर्ज मंजू न करता संबंधित लाेकांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पाेलीस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस येवले पुढील तपास करत आहे.
फ्लीपकार्ड या कंपनीत काम करुन कंपनीचा विश्वास संपादन करुन एका कर्मचाऱ्याने कंपनीचे विविध वस्तु ग्राहकांना वितरित करुन एकूण सात लाख 63 हजार रुपये स्वत:कडे जमा केले. मात्र, सदर पैसे कंपनीत जमा न करता त्याचा परस्पर स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनय श्रीपत प्रसाद (वय 24, रा. वाघाेली,पुणे) या आराेपीवर पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. आराेपी विराेधात लाेणीकंद पाेलिस ठाण्यात कंपनीच्या वतीने बळवंत सावळाराम कांबळे (वय 48, रा. उंड्री,पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply