कॉनरॅड संगमा यांना धक्का देण्याची भाजपची तयारी, नागा पीपल्स फ्रंटसोबत करणार हातमिळवणी

प्रत्येक निवडणुकीत भाजप आपली पावलं खूप सावधगिरीने टाकत असतं. त्यामुळे मनिपूरची सत्ता सहजासहजी जाऊ देईल असं वाटतं नाही.

मणिपूर – मणिपूरमध्ये (MANIPUR) पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपच्या (BJP) बड्या नेत्यांनी पुन्हा कंबर कसली आहे, कारण तिथं अनेक वर्षांनी सत्ता मिळाली होती. ती कायम ठेवण्यासाठी भाजप खूप संघर्ष करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

प्रत्येक निवडणुकीत भाजप आपली पावलं खूप सावधगिरीने टाकत असतं. त्यामुळे मनिपूरची सत्ता सहजासहजी जाऊ देईल असं वाटतं नाही. त्यामुळे भाजप कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (NPP )पासून दूर राहून नागा पीपल्स फ्रंट (NPF) सोबत हातमिळवणी करत असल्याची चर्चा मणिपूरमध्ये आहे. पण भाजप आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांच्यात अद्याप जागा वाटपावरून कोणताही वाद झालेला नाही त्यामुळे भाजप श्रेष्ठीकडून कोणता निर्णय घेतला जाईल हे काही दिवसात स्पष्ट होईल. अलीकडेच, NPF नेतृत्वाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये लवकरच मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे.

नागा पीपल्स फ्रंट यांनी भाजपकडे 15 सीटची मागणी केली आहे. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी 10 सीटवरती नागा पीपल्स फ्रंट यांनी भाजपसोबत निवडणुक लढवली होती. त्यापैकी त्यांना फक्त चार ठिकाणी विजय मिळाला होता. भाजप सद्या मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीसोबत सत्तेत आहे. पण यावेळी ते एकत्र येतील अशी चिन्ह दिसतं नाहीत.

गेल्या वेळी नॅशनल पीपल्स पार्टीच्या चार आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने बिरेन सिंग सरकारला अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी या सर्व आमदारांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मणिपूरातील सत्ता टिकवण्यासाठी भाजप पुन्हा एकदा सर्व शक्ती पणाला लावेल असं वाटतंय. राज्यातील सर्व 60 जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करू शकते, असेही बोलले जात आहे. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ६० पैकी ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणर असून 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान होईल. त्यानंतर 10 मार्चला त्याचा निकाल लागेल.

मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल. या टप्प्यातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी आणि नावेमागे घेण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची सूचना ४ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. या टप्प्यात 11 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी असेल.

Leave a Reply