कोयता गँगचा मोठा कट उधळला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे:- पुण्यात मागच्या दोन महिन्यांपासून कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान या कोयता गँगला वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. दरम्यान आज(दि.02) पुणे मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरात बेकायदेशीररित्या कोयते बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 18 कोयते जप्त करण्यात आले आहेत. मार्केट यार्ड पोलिसात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षामधून हे कोयते जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भवणसिंग भुरसिंग भादा (वय 35), गणेशसिंग हुमनसिंग टाक (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांकडून 18 कोयते आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत.

Leave a Reply