कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट पोहोचला 124 देशांत

नवी दिल्ली : -जगातील विविध देशांमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली असून आतापर्यंत जगातील 124 देशांमध्ये कोरोना पोहोचल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. या विषाणूचा फैलावण्याचा वेग आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत अधिक असल्यामुळे काही महिन्यांमध्ये तो 124 देशांमध्ये पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. लसीकरण झालेल्याज्या नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे, त्यातील बहुतांश जणांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून येत असल्याचं दिसून येत आहे.

भारतातून झाली सुरुवात

भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाच व्हेरियंट जबाबदार असल्याचं दिसून आलं आहे. आता जगातील इतर देशांमध्ये हा विषाणू धुमाकूळ घालत असून लवकरच तो इतर देशांमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारत, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, ब्रिटन, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया आणि चीनसह अनेक देशांमध्ये सध्या आढळणाऱ्या रुग्णांपैकी 75 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटने बाधित असल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकेत तर 83 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे नव्या व्हेरियंटचे असल्याचं आरोग्य मंत्रालयानं जाहीर केल आहे.
अभ्यास सुरू

लस न घेतलेल्यांप्रमाणे लस घेतलेल्या नागरिकांनाही या नव्या व्हेरियंटची लागण होत असल्याचं दिसून आलं असलं तरी लसीकरण झालेल्यांना या व्हेरियंटपासून असणारा धोका कमी असल्याचंही दिसून आलं आहे. लसीकरण झालेल्यांमध्ये यातून बरे होण्याचं प्रमाण 90 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. या नव्या व्हेरियंटशी लढण्यासाठी वेगाने लसीकरण होणे, हाच सर्वोत्तम उपाय असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.

Leave a Reply