कोरोनाच्या बिकट परिस्थितीत पुणे शहरातील पञकारांचे कार्य समाधानकारक – प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

पञकारांनी काम करताना काळजी घ्यावी माञ घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही

पुणे :-महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी आज पुणे शहरातील संघटनेच्या पदाधिकार्या बरोबर वेब संवाद साधला.या वेळी मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव व पुणे शहर अध्यक्ष नितीन बिबवे यांनी शहरातील पञकार सदस्यांना वेब चर्चेत आमंञित केले होते.तेव्हा सुरुवातीला नितीन जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वेब संवाद चर्चे च्या यशस्वी प्रयोगा बाबत शहर कार्यकारिणीला माहीती दिली तसेच प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याबाबत मत व्यक्त केले.
पुणे शहरात व जिल्ह्यात कोरोना साथरोगाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे तसेच रोगाचे संक्रमण वाढतच आहे. अशा बिकट परिस्थिती स्वतः चा जीव धोक्यात घालून अचूक पञकारिता करणे अवघङ असते पण पुणे शहरातील पञकारांनी पञकारिते बरोबर समाजसेवा करत सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रम राबवले असल्याचे स्पष्ट झाले.
या वेब बैठकीत पञकार संघाचे कार्यध्यक्ष किरण जोशी यांनी सर्व पञकार बांधवांना उल्लेखनीय मार्गदर्शन करत विचार मांडले . संपूर्ण मनुष्य जातीवरच कोरोनाचे संकट ऊभे ठाकले आहे अशात केवळ पञकारांना अङचण नाही तर सर्व समाजातील घटकांना त्याचा सामना करावा लागत आहे.सर्वांना धोका संभवतो तसेच या काळात संधी सुध्दा असते ती पारखता आली पाहीजे शिवाय पञकारिता ही आवङ (पॕशन) म्हणून करतो आहोत ,पञकारांनी काम करताना काळजी घ्यावी माञ घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही.पुणे शहरात अध्यक्ष नितीन बिबवे ,अमित गस्ते ,अभिजीत डुंगरवाल यांनी उत्कृष्ट कार्य केल्याचा उल्लेख किरण जोशी यांनी केला.
शहरात कोरोना पार्श्वभूमीवर संघामार्फत मास्क , सॕनिटायझर वाटप ,तसेच गरजू लोकांसाठी भोजन व्यवस्था राबवण्यात आली असल्याचे शहर अध्यक्ष नितीन बिबवे यांनी सांगितले . संघटनेचे राज्य सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप भटेवरा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले शहरात पञकार संघामार्फत कोरोनाच्या कठीण प्रसंगाला तोंड देत कौतुकास्पद उपक्रम राबवत समाजसेवा जोपासली .तसेच संघाचा प्रत्येक पदाधिकारी उत्कृष्ट कार्य करत असल्याचे सांगितले .
या वेळी शहर कार्यकारिणीतील अभिजीत ङुंगरवाल, पंकज बिबवे,शितल बर्गे,अरुण सोनावणे,मस्कू खवले यांनी वेब संवाद चर्चेत सहभाग घेत प्रदेशाध्यक्ष यांचेशी थेट चर्चा केली.या वेळी अभिजीत डुंगरवाल यांनी उपनगरीय पञकारांना वृत्तपञाकडून रितसर पञ मिळत नसल्याचे तसेच जिल्हा शासनाकडे प्रत्येक पञकार ,वार्ताहर यांची पञकार म्हणून नोंद व्हावी यासाठी संघटनेने पुढाकार घेण्यासंबंधी सुचना केली त्याला प्रदेशाध्यक्षांनी होकार दिला व तसे प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट केले.शितल बर्गे यांनी कोरोना परिस्थिती शहरात काम करताना प्रश्न निर्माण होत असल्याचे मत मांडले तर पंकज बिबवे अरुण सोनावणे यांनी कोरोना काळात संघटनेकडून राबवलेले समाजउपयोगी उपक्रम बाबत चर्चा केली .
शहर कार्यकारिणीतील सर्व पञकार सदस्यांनी दिलखुलासपणे चर्चा केली.या वेळी प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पुणे शहर कार्यकारिणी यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले तसेच पुण्यात कोरोना संक्रमण दर जास्त असताना आपण छान काम केले त्या बद्दल सर्व टिम चे अभिनंदन केले .तसेच संघटनेकडून पञकारांचे सर्वच प्रश्न अधोरेखित करत असून विमा कवच मिळवण्या बाबत घेतलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला व पॕकेज सवलती साठी विशेष प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. लाॕकडाऊन मध्ये वेब संवाद माध्यमातून चर्चा होत असल्यामुळे पञकारामध्ये उत्साह वाढत असल्याचा अनुभव मुंडे यांनी सांगितला .

2 Responses to “कोरोनाच्या बिकट परिस्थितीत पुणे शहरातील पञकारांचे कार्य समाधानकारक – प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे”

 1. Satish

  पत्रकार खरे covid योद्धा आहेत

  Reply
 2. Rahul bhandari

  Press is really working hard
  Govt should recognise their work

  Reply

Leave a Reply