गोणी वादळाची फिलिपाईन्सकडे कूच, किनारी भागातील गावे रिकामी करण्याचे आदेश

गोणी वादळ फिलिपाईन्सच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. कुझॉन प्रांतात सुरुवातीला वादळ शिरेल. पूर आणि दरडी कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मनाली – फिलिपाईन्स देशाने किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. सुमारे २६५ किमी वेगाने ‘गोनी’ वादळ देशाच्या पूर्व किनारी भागाकडे सरसावत आहे. त्यामुळे आपत्ती निवारण पथके सतर्क झाली असून किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पूर्व किनाऱ्यावर धडकणार वादळ
गोणी वादळ फिलिपाईन्सच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. कुझॉन प्रांतात सुरुवातीला वादळ शिरेल, असे देशाच्या हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील १२ तासांत वादळ रौद्र रुप धारण करणार आहे. सोबतच पूर आणि दरडी कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.देशाच्या हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले होते की, ‘गोनी’ हे वादळ रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी लुझोन बेटाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. ‘मोलावे’ वादळाने आधीच मोठा झटका दिलेले काही प्रांत या वादळाच्या मार्गात आहेत.वादळांचा धोका सततफिलिपाईन्समध्ये दरवर्षी सुमारे 20 टायफून आणि उष्ण कटिबंधीय वादळे येतात. 110 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या द्वीपसमूहात वारंवार भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेकही होतात. ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ आणि ‘पॅसिफिक टायफून पट्ट्या’त स्थान असल्यामुळे हा देश जगातील सर्वाधिक आपत्तीग्रस्त देशांपैकी एक आहे.

Leave a Reply