चित्रा वाघ यांनी राजीनामा देऊन पूजा चव्हाणला न्याय द्यावा:-तृप्ती देसाईं

पुणे:-माजी वनमंत्री संजय राठाेड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा देणे भाग पडले हाेतेे. राठाेेड यांच्या विराेधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संघर्ष करत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राठाेड यांनी भाजपसाेबत मंगळवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वपक्षीय महिल्या नेत्या आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी राजीनामा देऊन पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
देसाई म्हणाल्या, संजय राठाेड यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली हाेती आणि त्यात चित्रा वाघ या आघाडीवर हाेत्या. संजय राठाेड यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी ही बाब अत्यंत दुर्देवी असल्याचे ट्विट केले. परंतु वाघ यांना खरच पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांनी केवळ राठाेड यांचा समावेश दुर्देेवी न म्हणता पक्षाचा तात्काळ राजीनामा द्यावा. तरच सर्वसामान्यांना वाटेल तुमचा लढा खरा आहे. तसेच ‘लढेंगे और जितेंगे’ हे भाजपात राहून शक्य हाेणार नाही. कारण तुमच्या पक्षाने त्यांना मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. असेही त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण म्हणाल्या, मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात आलेले अब्दुल सत्तार, संजय राठाेड यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहे. असे असूनही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाेबतच ज्यांच्यावर याआधी ईडीबाबत आरोप होते अशांचाही यात समावेश आहे.

Leave a Reply