
मुंबई :- देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण वर्ष 2023-2024 बजेट सादर करत होत्या आणि तिकडे जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठा उलटफेर होत होता. अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर लावलेल्या फसवणुकीच्या आरोपानंतर भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. या रिपोर्टनंतर अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली. काही दिवसांपूर्वी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी थेट पंधराव्या क्रमांकावर घसरले आहेत. अवघ्या एका आठवड्यात गौतम अदानी यांच्या साम्राज्यात त्सुनामी आली आहे. रिसर्चने 24 जानेवारीला अदानी समूहाशी संबंधीत अहवाल प्रसिद्ध केला होता. ज्यात अदानी समुहाने घेतलेल्या कर्जाबाबत धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. या अहवालाचा च्या गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम झाला आणि कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ही घसरण अजून कायम आहे. अदानी समूहाचे शेअर्स आपटल्याचा थेट परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर झाला आहे. दररोज त्यांच्या संपत्तीत दररोज कोटींनी घट होत आहे. मंगळवारी गौतम अदानी Top-10 Billionaires च्या यादीतून बाहेर पडले. आणि आता तर ते थेट पंधराव्या क्रमांकावर घसरले आहेत. फोर्ब्सच्या रियल टाइम बिलेनियर्स इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात अदानी यांच्या संपत्तीत तब्बल 750000000000 कोटी रुपयांची घट झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 75.1 अरब डॉलर इतकी झाली आहे.