जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग, पुण्यात हौसिंग सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही सोसायट्यांनी नागरिकांवर निर्बंध घातल्यास संबंधित सोसायटीवर दंडनीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत. यामध्ये मोलकरीण, घरकामगार, पेपर विक्रेते, अत्यावश्यक सेवेतील इलेक्ट्रिशियन, प्लंबर यांना प्रतिबंध करता येणार नाही, असे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घालून दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी औंध येथील रोहन निलय या हौसिंग सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीत नव्याने राहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाला मेडिकल सर्टिफिकेटची मागणी करत सोसायटीत घेण्यास संबंधित चेअरमनने नकार दिला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही सोसायट्यांनी नागरिकांवर निर्बंध घातल्यास संबंधित सोसायटीवर दंडनीय आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काढले आहेत. यामध्ये मोलकरीण, घरकामगार, पेपर विक्रेते, अत्यावश्यक सेवेतील इलेक्ट्रिशियन, प्लंबर यांना प्रतिबंध करता येणार नाही, असे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.व्यवहार सुरळीत होण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन शिथील केला आहे. सर्व व्यवहार सुरुळीत होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सोसायट्या खबरदारी म्हणून परस्पर अनेक निर्बंध घालत आहेत. अत्यावश्यक सेवातील डॉक्टर, नर्स यांच्या कुटुंबीयांना त्रास देणे, मोलकरीण, घर कामगार, अत्यावश्यक सेवेतील इलेक्ट्रिशियन, प्लंबर यांना सोसायटीमध्ये येण्यास प्रतिबंध घातले जात आहे.दरम्यान, शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या हौसिंग सोसायटीवर कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. असे असताना औंध येथील रोहन निलय सोसायटीचे चेअरमन यांनी सोसायटीत प्रवेश करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची मागणी करीत जिल्हाधिकारी यांचा नियमांचे पालन देखील केले नाही. यामुळे पुणे शहराच्या सहकारी संस्था उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी संबधित सोसायटीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply