जेलर’मधील ज्येष्ठ कलाकाराचे निधन! चित्रपटसृष्टीत शोककळा

लोकप्रिय तमिळ अभिनेता आणि दिग्दर्शक जी मारीमुथु यांचे आज 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी जवळपास 8.30 च्या दरम्यान, एथिर नीचल या कार्यक्रमाचे डबिंग करत असताना अचानक स्टूडियोमध्ये पडले. त्यानंतर त्यांना लगेच जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. मारीमुथु हे युट्यूबवर नेहमीच चर्चेत रहायचे. त्यांना अखेरचं रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटात पाहिले. त्या आधी ते रेड सॅन्डल वूडमध्ये दिसले होते. त्यांचे अचानक निधन झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
जी मारीमुथु यांच्याविषयी बोलायचे झाले तर ते त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जायचे. सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणावर त्यांची प्रतिक्रिया देत ते चर्चेत रहायचे. तर दी मारीमुथु यांनी जेलर या चित्रपटात खलनायकासोबत राहणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज 8 सप्टेंबर रोजी जी मारीमुथु हे त्यांचा सहकलाकार कमलेश यांच्यासोबत छोट्या पडद्यावरील मालिका ‘एथिर नीचल’ साठी डबिंग करत होते. डबिंग दरम्यान, चेन्नईच्या स्टूडिओमध्ये पडले. जेव्हा त्यांना वडापलानी यांच्या एका खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना तिथेच मृत घोषित केले.

Leave a Reply