जेव्हा तिसरा रेकॉर्ड कराल तेव्हा मात्र मला बोलवू नका, मी येणार नाही;उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुणे विद्यापीठातील एक वक्तव्य सध्या चर्चेत.

पुणे:- शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर 38 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये शिंदे आणि भाजपकडून प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या ‘स्वराज्य महोत्सव आणि घरोघरी तिरंगा’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, भाषणाच्या शेवटी त्यांनी यावर सारवा सारव केली. हर घर तिरंगाच्या धर्तीवर पुणे विद्यापीठात स्वराज्य महोत्सव साजरा होतोय. याला उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यापीठाचे प्र कुलगुरू कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, की पुणे विद्यापीठाने पहिला रेकॉर्ड केला तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. आता तुम्ही दुसरा रेकॉर्ड करताय मी उपमुख्यमंत्री आलोय. पण जेव्हा तिसरा रेकॉर्ड कराल तेव्हा मात्र मला बोलवू नका, मी येणार नाही, असं बोलताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, भाषण संपवताना फडणीसांनी आपल्याच विधानावरून यू टर्न घेतला. पुढच्या कार्यक्रमालाही मला बोलवा, मी कोणत्याही पदावर असलो तरी नक्की येईल, असे म्हणत फडणवीनी सारवासारव केली.
अशा कार्यक्रमातून राष्टप्रेम वाढीस लागून नवी पिढी नव्या उमेदीने जगासमोर येतेय. पंतप्रधानांनी मांडलेली ही अमृत महोत्सवाची संकल्पना या वेळी खऱ्याअर्थाने प्रत्येक भारतीयाशी हर घर तिरंगाच्या माध्यमातून जोडली जातेय. नेहमीप्रमाणे हा फक्त सरकारी कार्यक्रम बनून राहात नाही तर तो लोकांशी जोडला जात आहे. तिरंगा हेच तर आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानाचं प्रतिक आहे, म्हणून हा प्रोग्राम महत्वाचा आहे. पुणे विद्यापीठाच्या उपक्रमांतर्गंत प्रत्येक युवकाने आपल्या तिरंग्यासोबतचा फोटो वेबसाइटच्या लिंकवर अपलोड करायचाय हा एक गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड असणार आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्याचे अनसंग हिरोज पण समाजासमोर आणायचे आहेत, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply