तृतीयपंथीयाला डोक्यावर बीअरची बाटली मारून आणि चाकूने वार

पुणे :- रिक्षाची वाट बघत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका तृतीयपंथीयाला डोक्यावर बीअरची बाटली मारून आणि चाकूने वार करून जखमी केले. तसेच त्याच्या तीन मैत्रिणींनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दिघीतील आळंदी रोड परिसरात रविवारी (दि. २९) ही घटना घडली.अक्षय ऊर्फ जोया हजेरी (वय २३, रा. येरवडा) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोन्या माने व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अक्षय व त्यांच्या मैत्रिणी हे रिक्षाची वाट बघत थांबले होते. या वेळी मोन्या माने व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर रिक्षाची वाट पाहत असल्याच्या कारणावरून चिडून हातातील बीअरच्या बाटलीने अक्षयच्या डोक्यात मारून, तसेच चाकूने कमरेवर वार करत जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मैत्रिणींनादेखील आरोपी मोन्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

Leave a Reply