तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण

तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच झळ आता गृहमंत्र्यांना देखील पोहोचली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचा एक नातेवाईक देखील बाधित झाला आहे. गृहमंत्र्यांबाबत विचारले असता सरकारमधील कोणीही बोलायला तयार नाही.

हैदराबाद – तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद अली यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सुरक्षारक्षकांमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे गृहमंत्र्यांना लागण झाली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.
तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याच झळ आता गृहमंत्र्यांना देखील पोहोचली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचा एक नातेवाईक देखील बाधित झाला आहे. गृहमंत्र्यांबाबत विचारले असता सरकारमधील कोणीही बोलायला तयार नाही.
गेल्या २४ तासांत ९८३ कोरोनाचे नवे रुग्ण -गेल्या २४ तासांत तेलंगणामध्ये कोरोनाचे ९८३ नवे रुग्ण सापडले. यापैकी ८१६ रुग्ण एकट्या हैदराबादेतील आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ४१९ वर पोहोचली आहे. तसेच चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २४७ वर पोहोचली आहे. तसेच आज २४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ५ हजार १७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ९ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply