दरोडा टाकण्याचा प्रयत्न:ज्वेलर्स मालकावर वार

ज्वेलर्स मालकावर वार करून दरोड्याचा प्रयत्न

पुणे:-ज्वेलर्समध्ये थांबलेल्या मालकावर सुरीने वार करून जखमी करत चोरट्याने भरदिवसा दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना १९ मे रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास आंबेगाव बुद्रुकमधील वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्या फुटेजनुसार आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विनोदकुमार सोनी (४२, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विनोदकुमार यांचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ते दुकानात थांबले होते. त्या वेळी वाहनातून आलेल्या एकाने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर अचानकपणे हातात सुरी घेऊन विनोदकुमार यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरटा पसार झाला.

Leave a Reply