दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

पुणे :-दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अमोल पाटील असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल पाटील व जुन्नर तालुका बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. केतनकुमार पडवळ यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिला. त्याची पडताळणी केली असता त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर प्रत्यक्ष सापळा कारवाई होऊ शकली नाही. मात्र, लाच मागितल्याचे आढळून आल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन अमोल पाटील व ॲड.केतनकुमार पडवळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाटील याला अटक केली असून सध्या त्याला न्यायालयात नेण्यात आले आहे.

Leave a Reply