दीपक मारटकर खून प्रकरणात मोठी कारवाई ; सहा पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

शिवसेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींनी कुख्यात गुंड बापू नायर याची ससून रुग्णालयात भेट घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना भेटूच कसे दिले, असा ठपका ठेवत पोलीस प्रशासनाने 6 कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.

पुणे – शिवसेनेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींनी कुख्यात गुंड बापू नायर याची ससून रुग्णालयात भेट घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. यावेळी सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना भेटूच कसे दिले, असा ठपका ठेवत पोलीस प्रशासनाने 6 कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.
दीपक मारटकर यांची हत्या कुख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार 11 जणांविरुद्ध ‘मोक्का’नुसार कारवाई करण्यात आली आहे. मारटकर यांच्या हत्येपूर्वी आरोपींनी कुख्यात गुंड नायर याची ससून रुग्णालयात भेट घेतली होती. त्याचा ठपका ठेवत पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एक हवालदार आणि 5 कॉन्स्टेबलचा समावेश आहे. सर्व कॉन्स्टेबल 2016 च्या बॅचचे आहेत.
बंदोबस्त असतानाही आरोपी बापू नायरच्या भेटी
लाकुख्यात गुंड बापू नायर सध्या येरवडा कारागृहात आहे. काही दिवसांपूर्वी उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या कर्मचा-यांचा कडक बंदोबस्त असताना आरोपी नायरला भेटले कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर प्रकरणाची खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली. त्यानुसार कामात कुचराई करत पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. एक ऑक्टोबरच्या रात्री जेवण झाल्यानंतर ते घराबाहेर आले आणि एका मित्रासोबत बसले होते. यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने 48 वार केले. जखमी अवस्थेत दीपक यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply