दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार

पुणे :- बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने स्पर्धेत विजयाचा चौकार नोंदविला आहे. ब्रेव्हहार्ट क्रिकेट अॅकॅडमी संघाने स्पर्धेत पहिला विजय नोंदविला आणि गुणांचे खाते उघडले. सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत धनराज शिंदे ७५ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने इव्हॅनो इलेव्हन संघाचा १६ धावांनी पराभव केला. ४०० हून अधिक धावा निघालेल्या या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने २० षटकात २३१ धावांची विशाल धावसंख्या उभी केली. धनराज शिंदे याने ३४ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७५ धावांची खेळी केली. यश खळदकर याने ५८ धावांची तर, ओकांर खाटपे याने २८ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना इव्हॅनो इलेव्हनचा डाव २०५ धावांवर मर्यादित राहीला. तुषार सिन्हा (नाबाद ८३ धावा) आणि शुभम जाधव (नाबाद ६७ धावा) यांनी इव्हॅनो संघाकडून जोरदार प्रतिकार केला. जय सी. याच्या ८२ धावांच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्रिकेट अॅकॅडमी संघाने क्रिकेट अॅकॅडमी ऑफ पठाण्स संघाचा ११५ धावांनी सहज पराभव करून गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट अॅकॅडमीने २२८ धावांचा डोंगर उभा केला. जय याने ३० चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. वैभव लव्हांडे (६५ धावा) आणि चित्तरंजन रे (३६ धावा) यांनीही दुसर्या बाजूने साथ दिली. या आव्हानासमोर क्रिकेट अॅकॅडमी

Leave a Reply