देशातील ११ शहरांमध्ये पोहोचली कोव्हॅक्सिन लस; भारत बायोटेकची माहिती

कंनपीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कोव्हॅक्सिनच्या ५५ लाख डोसेसची मागणी केली आहे. त्यानंतर कंपनीने पहिल्या खेपेत १६.५ लाख लसी पाठवल्या आहेत. गनावरम, गुवाहाटी, पाटणा, दिल्ली, कुरुक्षेत्र, बंगळुरू, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनऊ या शहरांमध्ये ही लस पाठवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील सीरमची कोविशिल्ड ही लस सध्या देशभरात पोहोचत आहे. याचदरम्यान, हैदराबादमधील भारत बायोटेकेनेही आपली ‘कोव्हॅक्सिन’ ही लस देशातील ११ शहरांमध्ये पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच हवाई मार्गाने ही लस ११ ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती कंपनीने बुधवारी दिली.

५५ लाख डोसेसची आहे ऑर्डर..

कंनपीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कोव्हॅक्सिनच्या ५५ लाख डोसेसची मागणी केली आहे. त्यानंतर कंपनीने पहिल्या खेपेत १६.५ लाख लसी पाठवल्या आहेत. गनावरम, गुवाहाटी, पाटणा, दिल्ली, कुरुक्षेत्र, बंगळुरू, पुणे, भुवनेश्वर, जयपूर, चेन्नई आणि लखनऊ या शहरांमध्ये ही लस पाठवण्यात आली आहे.

लॅटिन अमेरिकामध्येही पाठवणार लस..

यासोबतच, भारत बायोटेकने बुधवारी प्रेकिसा मेडिकॅमेन्टोस या कंपनीसोबतही करार केला. ब्राझीलमध्ये असलेल्या या कंपनीमार्फत लॅटिन अमेरिकामध्ये कोव्हॅक्सिनचे वितरण करण्यात येणार आहे.

कोव्हॅक्सिन ही पूर्णपणे स्वदेशी कोरोना लस आहे. भारत बायोटेक, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी संयुक्तपणे या लसीची निर्मिती केली आहे. हैदराबादमध्ये याचे उत्पादन घेतले जात आहे.

Leave a Reply