नवरात्रोत्सवात फोटो काढल्याच्या राग:दोन गटात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हा दाखल

पुणे:-नवरात्रोत्सवात खेळताना फोटो काढल्याच्या रागातून दोन गटात मारामारी झाल्याची घटना 30 सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास वारजेतील विठ्ठनगर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी शनिवारी तक्रार दाखल केली आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.दांडिया खेळत असताना फोटो काढल्याचा राग आल्यामुळे 100 ते 150 जणांनी श्रमिक हक्क आंदोलनाचे अध्यक्ष युवराज बगाडे (वय 44, रा. शनिवार पेठ, पुणे) यांना मारहाण केली. त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला. याप्रकरणी 100 ते 150 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रायकर तपास करीत आहेत.संगीत खुर्चीचा खेळ सुरू असताना युवराज बगाडे याने महिला व मुलींचे फोटो काढल्याचा जाब विजया गलांडे (वय 40) यांनी विचारला. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाल्याने आरोपींनी महिलेसह पतीला मारहाण केली. त्याशिवाय इतर महिलांचा खाली पाडून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी युवराज बगाडे, मकरंद पवार, मनोज वाघमारे, श्रावणी बुवा, धनश्री मांदळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस तपास करीत आहेत.

Leave a Reply