नवऱ्याला अटक केल्यामुळे शिल्पा शेट्टीची ‘सुपर डान्सर’च्या शूटला दांडी!

शिल्पा शेट्टीचा नवरा, राज कुंद्राला अटक केल्यापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली आहे. शिल्पाला लोकांच्या नजरांना तोंड देणे अवघड झाले आहे. ती सुपर डान्सर या शेची परिक्षक आहे. आज या शोचे मुंबईत शुटिंग होते. मात्र शिल्पाने या शोला दांडी मारली आहे.

शिल्पा शेट्टीचा नवरा, राज कुंद्राला अटक केल्यापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली आहे. खुद्द शिल्पा शेट्टीला देखील नक्कीच मनस्ताप झाला असणार. आता तो नवऱ्यावरील प्रेमामुळे की त्याच्या घृणास्पद करतूतींमुळे हे तीच जाणे. परंतु समाजात आणि खास करून बॉलिवूडकरांना तोंड दाखविणे तिच्यासाठी नक्कीच कठीण जाणार आहे. त्यामुळेच, कदाचित, शिल्पा शेट्टी, जी डान्स रियालिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ४ च्या परीक्षणाचे काम करते, आज मंगळवारी २० जुल ला, आयत्यावेळी शूटिंगसाठी पोहोचलीच नाही. शेवटच्या क्षणी शोच्या आयोजकांना ती काही ‘खाजगी’ कारणास्तव पोहोचू शकत नसल्याचे समजले.

भारतीय कायद्याबरोबर खेळण्याची राज कुंद्राची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही भारतात त्याने बेकायदा कृत्ये केली असून तो भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यात यशस्वी झाला होता. त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्यामुळे भारतातील कायदे त्याला लागू होत नसावेत असा त्याचा भ्रम असावा. परंतु मुंबई पोलिसांनी तो भ्रम मोडला आहे आणि त्याला ‘अश्लील पोर्नोग्राफिक व्हिडीओज’ बनविण्याच्या व वितरित करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून तो पुढील ४-५ दिवस पोलिसांच्या कस्टडीत असेल. राज कुंद्राचा अश्लील व्हिडीओज बनविण्यात हात असल्याचे धागेदोरे पोलिसांना सापडले असून ते या प्रकरणावर लक्ष ठेऊन होते व पुरावे हातात आल्यावर त्याच्या मुसक्या आवळल्या. ‘पोर्नोग्राफी’ फिल्म्स बनविण्यासाठी राज कुंद्रा अर्थसहाय्य करीत होता असा पोलिसांचा आरोप आहे.

शिल्पा शेट्टीने लंडनस्थायिक व्यावसायिक राज कुंद्रा सोबत लग्न केले. परंतु राजचे आधीच एक लग्न झालेले होते व त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन शिल्पासोबत संसार थाटला. भारतामध्ये शिल्पा खूप प्रसिद्ध आहे आणि चित्रपटाव्यतिरिक्त ती तिच्या योगाभ्यासासाठी फेमस आहे. हल्लीच तिने चित्रपटातून पुनरागमन केले होते व तिचा ‘हंगामा २’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. परंतु अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे शिल्पा शेट्टीला घरातून बाहेरही पडणे मुश्किल झाले आहे. त्यातच गेल्यावर्षीपासून सामान्य जनता बॉलिवूडकरांवर नाराज आहे आणि शिल्पाच्या नवऱ्याच्या अश्या वागण्यामुळे ते अजूनच नाराज झालेले दिसताहेत.

साहजिकच शिल्पाने सुपर डान्सरच्या शूटिंग न जाणे इष्ट समजले. या आठवड्यात करिष्मा कपूर अतिथी कलाकार म्हणून येणार असून ती शूटला पोहोचली होती परंतु बराच वेळ शिल्पाची वाट पाहून निर्मात्यांनी कार्यक्रमाचे शूटिंग करिष्मा कपूर, गीता कपूर आणि अनुराग बसू यांच्याबरोबर सुरु केले. या आठवड्याच्या ‘सुपर डान्सर’ च्या भागांमध्ये शिल्पा शेट्टी कुंद्रा दिसणार नसल्याचे सूत्रांकडून समजते.

आता महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या नवऱ्याच्या करतूतींमुळे शिल्पा शेट्टी कुंद्रा किती दिवस तोंड लपवत फिरणार आहे.

Leave a Reply