नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? एखाद्या महिलेला लेडी डॉन बोलणे चुकीचे, मनसेने केली जास्मिन वानखेडेची पाठराखण

मनसे आक्रमक:नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का?

किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे गेल्या 18 दिवसांपासून तुरुंगात आहे. त्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांनी एनसीबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी एनसीबीची ही कारवाई बोगस असल्याचे म्हटले होते. तसेच एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहिण जास्मिन वानखेडे हिच्यावर देखील मलिकांनी आरोप केले होते. त्यामुळे आता मलिकांवर मनसे आक्रमक झाली आहे.

मनसेने पत्रकार परिषद घेत जास्मिनची पाठराखण केली आहे. तसेच जास्मिन वर नबाब मलिक यांच्याकडून केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही. असे मनसेच्या वतीने अमेय खोपकर यांनी सांगितले आहे. जास्मिन वानखेडे या चित्रपट सेनेच्या पदाधिकारी राहिल्या असून, त्या महिला आणि मुलांसाठी न्याय मिळवून देण्याचे काम करतात.

मनसेने पत्रकार परिषद घेत म्हटले आहे की, ‘आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. नबाब मलिकांकडे त्यांच्या विरोधात पूरावे आहेत का? नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. त्यांनी एखाद्या महिलेला लेडी डॉन बोलणे चुकीचे आहे. जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. चांगल्या कामाच्या मागे मनसे नेहमीच उभी राहील’ असे मनसेचे नेते खोपकर यांनी म्हटले आहे.

पुढे खोपकर म्हणाले की, ‘महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालते तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो त्यांना अटक करून दाखवा’ असे आव्हान देखील मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply