नागपुरात एकाच दिवशी 14 जण पाॅझिटिव्ह; एकूण आकडा 41वर..

नागपूर शहरात कोरोनाचा धोका आणखी गडद होताना दिसत आहे. आज एकाच दिवशी सर्वाधिक 14 जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपमधील कोरोना बाधितांना एकूण आकडा 41 वर पोहचला आहे.

नागपूर – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा धोका आणखी गडद होताना दिसत आहे. आज एकाच दिवशी सर्वाधिक 14 जणांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपमधील कोरोना बाधितांना एकूण आकडा 41वर पोहचला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. वाढणारी आकडेवारी पाहता नागपूरच्या चिंतेत वाढ झाली आहे.
ज्या 14 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामधील 9 जण हे नागपूर शहरातील आहेत. तर एक जण नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील रहिवासी आहे. उर्वरित 4 रुग्ण हे मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील रहिवासी आहेत. या सर्वांचा दिल्ली येथील तबलिगी जमातशी थेट संबंध असल्याची माहिती पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.एक एप्रिलला 52 लोकांना मरकझ येथून नागपुरला परत येताच जिल्हा प्रशासनाने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले. त्यांना आमदार निवास येथे ठेवले होते. त्यापैकी आज 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या थेट 41 वर जाऊन पोहचली आहे. अचानक वाढलेली ही आकडेवारी नागपूरकरांसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सूचना मानून घरीच राहावे, असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

One Response to “नागपुरात एकाच दिवशी 14 जण पाॅझिटिव्ह; एकूण आकडा 41वर..”

 1. Prakash Wakode

  Movements of people can still be reduced by
  1. Work from Home for Banking sector & other sectors wherever possible.
  2. Home delivery of day to day essential commodities throgh Govt agency, by hiring private vehicles & drivers.
  3. Private corporate hospitals where respiratory emergency can be handled, to be taken in Govt control. And doctors & staff on deputation for Govt service till next 3 months.

  Reply

Leave a Reply