नागपुरात कोविड चाचणी आपल्या दारी चे आयोजन

नागपूर प्रतिनिधी बबिता धुर्वे

कोरोना महामारीच्या संकटा वर मात करण्यासाठी नागपुरात घरोघरी जाऊन करोना चाचणी चे नियोजन . नागरिकांचा मोठा प्रतिसाद देत एकत्र लढण्याचा निश्चय

नागपूर :-नागपूर मध्ये दिवसेंदिवस कोरोना चा डब्लिंग रेट आटोक्यात येत आहे . जास्तीत जास्त कोरोना टेस्ट आणि लवकरात लवकर संकटातून बाहेर पडण्यासाठी प्र,क्रमांक१३येथे संजय नगर शिव सेना आँफीस जवळ ,नागपूर महानगरपालिका धरमपेठ झोन अंतर्गत ,धरमपेठ झोन सभापती व प्र,क्रमांक१३ नगरसेवक अमजी बागडे यांनी निशुल्क कोविळ चाचणी चा शुभारंभ केला . कोरोना चाचनी मोबाइल गाडी आपल्या दारी हि संकल्पना राबवून नागरिकांना करोना चाचणी करण्याचे आव्हान ह्या वेळी करण्यात आले . कोरोना व्हायरस सारख्या संक्रमणामुळे मानवी जीवनावर आलेल्या महामारी ला रोखन्यासाठी ,शिबीर हि आयोजन करण्यात आले. ह्या प्रसंगी नागरिकांनी गांभीर्य जाणून आपली चाचणी करून घेत मोठा प्रतिसाद दिला . अध्यक्ष हिरुभाऊ चौधरी, वार्ड अध्यक्ष विजय जी चवरे,सामाजिक कार्यकर्ते, सागर भाऊ जाधव ,सामाजिक कार्यकर्ति बबिता ताई धुर्वे, सामाजिक कार्यकर्ते मयुर सोनेकर, मनोज पोतदार, हे उपस्थित होते, या कार्यक्रमाला,श्री प्रमोदजी कौरती ( नगरसेवक) श्री विनोदजी कन्हेरे ( मंडल अध्यक्ष) तेलंगखेड़ी वार्ड अध्यक्ष- गोपाळ बावनकुळे यांनी भेट दिली.

One Response to “नागपुरात कोविड चाचणी आपल्या दारी चे आयोजन”

  1. लक्ष्मीकांत वामानराव डखरे

    या अभिनव प्रयत्नां बद्घल धन्यवाद् ! अशाच चाचन्या ह्या प्रत्येक मनपा झोन अन्तर्गत प्रत्येक प्रभागात घेण्यात याव्यात आणि याबाबतची सूचना संबंधित झोन कार्यालय आणि संबंधित प्रभागांच्या नगरसेवक यांचे द्वारे समाज माध्यम वॉट्स ऐप फेसबुक द्वारे निदान २ दिवसा आधी प्रसारीत करण्यात याव्यात, ही विनंती ! जेणेकरून या योजनेचा संधीचा लाभ संपूर्ण नागपूर शहरवासी यांना होईल आणि शहर लवकर कोरोना मुक्त होईल. अपल्या या अभिनव प्रयत्न आणि लोकोपयोगी उपक्रमास शुभेच्छा !

    Reply

Leave a Reply