नागपूर जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच राहतील सुरू

राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान नागपूर जिल्ह्यात अनेक नागरिक किराणा किंवा जीवनावश्यक सामुग्री खरेदी करण्याच्या नावाखाली सर्रासपणे बाहेर निघत असल्याने रस्त्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे, संचारबंदीचा फज्जा उडत होता, त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने आता प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवता येईल, असे आदेश निर्गमित केले आहेत.

नागपूर – राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान नागपूर जिल्ह्यात अनेक नागरिक किराणा किंवा जीवनावश्यक सामुग्री खरेदी करण्याच्या नावाखाली सर्रासपणे बाहेर निघत असल्याने रस्त्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे, संचारबंदीचा फज्जा उडत होता, त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने आता प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवता येईल, असे आदेश निर्गमित केले आहेत.

दुकाने/आस्थापने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार
आजपासून हा आदेश लागू झाल्याने नागपूरच्या महत्वाच्या बाजारपेठ असलेल्या इतवारी, सीताबर्डी भागातील व्यापाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला. नागपूरची परिस्थिती हाताबाहेर जात असताना नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. नागपूर शहराच्या हद्दीत कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता प्रतिबंध करण्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक असल्याने नागपूर महानगरपालिकेकडून काही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेशी निगडीत असलेली सर्व दुकाने (मेडीकल दुकाने वगळून ) सम/विषम तत्वावर सुरू ठेवता येतील, हा आदेश रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत असल्याने त्यावर आवश्यक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवशी निगडीत दुकाने/आस्थापने केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

कोविड विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून परीक्षा घेता येतील
नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था (कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) व इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच, राष्ट्रीय/राज्य/ विद्यापीठ/ शासन स्तरावरील पूर्वनियोजित परिक्षा कोविड विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येतील. नागपूर शहर सिमेत सर्व प्रकारच्या धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. अत्यंत तातडीची नसलेली शस्त्रक्रिया पुढे ढकलणे शक्य असल्यास अशा शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

काय सुरू राहतील ?
वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स, वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा (ओळखपत्राच्या आधारे) पेट्रोल पंप, गॅस एजन्सी सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा, माल वाहतूक सेवा, बांधकामे (फक्त साईटवरच लेबर उपलब्ध असल्यास), बँक व पोस्ट, सेवा कोरोना विषयक लसीकरण सेवा, चाचणी केंद्रे अत्यावश्यक सेवेतील उद्योग, कारखाने, किराणा दुकाने, बेकरी दुकान, दुध विक्री/फळ विक्री व पुरवठा, भाजीपाला व्रिकी व पुरवठा, चिकन, मटन, अंडी व मास दुकाने, पशू खाद्य दुकाने, ऑप्टिकल्स दुकाने, खते व बी-बियाणे दुकाने सुरू राहातील.

Leave a Reply