नागपूर विभागात पशुधन लसीकरणासाठी अतिरिक्त 17 लाख लसमात्रांची मागणी, पैकी मिळाल्या फक्त 3 लाख

नागपूर:- संपूर्ण राज्यासह नागपूर विभागातही लम्पी रोगाने पशुधनाला ग्रासले आहे. लसीकरण हा त्यावरील एक उपाय आहे. नागपूर विभागात पशुधन लसीकरणासाठी अतिरिक्त 10 लाख लसमात्रांची मागणी करण्यात आली असून त्यापैकी फक्त 3 लाख लशी मिळाल्याची माहिती सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डाॅ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाने यांनी दिली आहे.

नागपूर विभागात एकूण पशुधन 20 लाख 55 हजार 476 इतके आहे. लम्पीमुळे आतापर्यत नागपूर जिल्ह्यांत 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. विभागात एकूण 25 बाधित गावे असून 258 बाधित जनावरे आहे. विभागात आजपर्यंत 41,655 पशुधनाचे लसीकरण झालेले आहे. विभागात हिंगणा, सावनेर, पारशिवनी, कामठी, नागपूर, मौदा, काटोल, कळमेश्वर, आर्वी, आष्टी, कारंजा, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, सावली असे एकूण 15 तालुक्यात प्रादुर्भाव आहे. नागपूर विभागात 3 लाख 10 हजार लसमात्रा मिळालेल्या आहे.

Leave a Reply