नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी दुनेश्‍वर पेठे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी दुनेश्वर पेठे यांची यांची निवड करण्यात आली आहे.

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी दुनेश्वर पेठे यांची यांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठकीत दुनेश्वर पेठे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दुनेश्वर पेठे हे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट नेते आहेत.
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल अहिरकर यांनी नागपूर शहराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. शहराध्यक्षपदी अनेकांच्या नावावर विचार झाल्यावर दुनेश्वर पेठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पेठे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून खांदेपालट
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. तर गोंदियामध्ये राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सक्रिय आहेत. त्या व्यतिरिक्त विदर्भात पक्षाचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे नागपूरसह विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने खांदेपालट स्थानिक नेतृत्वाची केली जात आहे. या शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देखील नव्या नेतृत्वाला पक्षाकडून संधी दिली जात असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply