नायलॉन मांज्याच्या दोऱ्याने गळा कापला गेल्याने वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात एका दुचाकी चालकाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रणय ठाकरे असे या २० वर्षीय तरुणाचे नाव आहे. प्रणय दुचाकी मोपेडने जात असताना रस्त्यावर नायलॉन मांज्याचा दोरा आडवा आला. हा दोरा त्याच्या गळ्याभोवती आवळला गेल्यामुळे प्रणयचा गळा अर्ध्यापेक्षा जास्त कापला गेला. ज्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

नागपूर - नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात एका दुचाकी चालकाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रणय ठाकरे असे या २० वर्षीय तरुणाचे नाव आहे. प्रणय दुचाकी मोपेडने जात असताना रस्त्यावर नायलॉन मांज्याचा दोरा आडवा आला. हा दोरा त्याच्या गळ्याभोवती आवळला गेल्यामुळे प्रणयचा गळा अर्ध्यापेक्षा जास्त कापला गेला. ज्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

गेल्या दिवसांपासून नायलॉन मांज्याविरोधात पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका कारवाई केल्याचा देखावा करत आहे. ज्यामुळे बंदी असताना देखील सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. प्रणय काही कामासाठी जात असताना अचानक मांजा त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला होता. घटनेची माहिती समजताच इमामवाडा पोलिसांनी प्रणयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. याआधीची नायलॉन मांज्याच्या दोऱ्याने कापल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या एका तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमधून हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

थोडक्यात वाचला होता आदित्य
३० डिसेंबरला नागपुरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळे गळा कापला गेल्यामुळे १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. आदित्य मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून बाईकने कॉम्प्युटर क्लासला जात होता. तेव्हा त्याच्या बाइकसमोर अचानक हवेतून नॉयलॉन मांज्याचा दोरा आडवा आला. त्यामुळे आदित्यचा गळा कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत आदित्य दुचाकीवरून खाली कोसळला आणि बरेच लांब फरफटत गेला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचारांसाठी जवळील खासगी रुग्णालयामध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्याची स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला अन्य एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे आदित्यचा जीव थोडक्यात वाचला होता. मात्र, प्रणयवर उपचार करण्याची संधीदेखील मिळाली नाही.

Leave a Reply