‘नाळ 2′ येणार प्रेक्षकांच्या भेटीला:नागराज मंजुळेची पोस्ट

सैराट, फॅण्ड्री अशा गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘नाळ 2′ ची नुकतीच घोषणा केली आहे. फेसबूकवर पोस्ट करत या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. हा गाजलेल्या ‘नाळ’ सिनेमाचा दुसरा भाग असणार आहे.

नागराज पोस्ट केली आहे की,’मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकायला कधी भेटुयात ? नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या “नाळ” प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे ! “नाळ 2” नावानं चांगभलं
‘नाळ’ या चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त आणि प्रचंड यश मिळाले आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळेने चिमुरडा चैत्या, देविका दफ्तारदार यांनी त्याची आई आणि नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण चित्रपटाने टीमने नुकतंच शूटिंगला सुरुवात केली आहे.

Leave a Reply