नाशिक-मुंबई महामार्गावर खासगी बसला आग; बस जळून खाक

नाशिक-मुंबई महामार्गावरील व्हिलोळी गावा जवळ आज दुपारी चार वाजेच्या सुमारास एका खासगी बसला आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत बस संपूर्णत: जळून खाक झाली होती.

नाशिक - नाशिक-मुंबई महामार्गावरील व्हिलोळी गावा जवळ आज दुपारी चार वाजेच्या सुमारास एका खासगी बसला आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत बस संपूर्णत: जळून खाक झाली होती.

मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसने अचानक पेट घेतला. सुरवातीला बसच्या काही भागाला आग लागलेली होती. मात्र, काही क्षणात संपूर्ण बस आगेच्या भक्षस्थानी आल्याने आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. मात्र, अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत बस संपूर्णत: जळून खाक झाली होती.

चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला..

घटनास्थळाहून प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नसून, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. या बसने नाशिक-मुंबई महामार्गावरील व्हिलोळी गावाजवळ पेट घेतला. त्या ठिकाणाहून अवघ्या काही अंतरावर पेट्रोल पंप असल्याने महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बसमधील 30 प्रवासी वेळीच उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply