
ATR 72 विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार, विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते.
नेपाळ:- नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे ATR 72 विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार, विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. हे विमान काठमांडूहून पोखरासाठी उड्डाण केल्यानंतर 20 मिनिटांनी काही किलोमीटर अंतरावर कोसळले. नेपाळमध्ये विमान अपघातांचा मोठा इतिहास आहे. डोंगराळ प्रदेश, हवामानाचा न येणारा अंदाज, नवीन विमाने आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीची कमतरता आणि खराब नियमन दुर्दैवी घटनांना कारणीभूत आहेत. एव्हिएशन सेफ्टी डेटाबेसनुसार, नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षांत किमान 27 विमान अपघात झाले आहेत. नेपाळ भूमीवरील विमान अपघातात आतापर्यंत नेपाळमधील स्थानिकपासून ते नेपाळचे मंत्री, राजकन्या, भारतीयांसह अनेक देशी, विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
2 Responses to “नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू”
suresh vatve
खूपच भयानक
मृतांना श्रद्धांजली
deepak parmar
मृत प्रवास्यांना श्रद्धांजली