पंतप्रधान मोदींची कोरोना व्हॅक्सिन निर्मात्या कंपन्यांशी चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोना व्हॅक्सिन निर्मात्या फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोना व्हॅक्सिन निर्मात्या फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा केली. यापूर्वी सोमवारी त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती. याच बरोबर पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत औषध क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेचेही कौतुकही केले.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात खळबळ माजली आहे. देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक लोक रुग्णालयात बेडची कमतरता व ऑक्सीजन तथा रेमडेसिवीर तुटवठ्याच्या तक्रारी करत आहेत. त्यामुळे पीएम मोदींनी आजच्या बैठकीमध्ये या समस्यावर व १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाबाबत चर्चा केली.देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे तरी रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे.

Leave a Reply