पुण्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावरून पाठवले परत

कलम 144 लागू असतानाही रस्त्यांवरील वर्दळ कमी होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू करत असल्याचे सांगितले आहे.

पुणे – शहरातून सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सोमवारी बंद करण्यात आली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर पुण्याकडून येणारी वाहने अडवण्यात आली. त्यानंतर या वाहनांना परत पाठवण्यात आले. टोल नाक्यावर घोषणा करून नागरिकांना पुढे न जाता परत जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला लगाम घालण्यासाठी राज्यात आजपासून कलम 144 लागू करण्यात आले आहे. तरीही रस्त्यांवरील वर्दळ कमी होत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू करत असल्याचे सांगितले आहे.

One Response to “पुण्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना टोलनाक्यावरून पाठवले परत”

  1. Shakeel Shaikh

    Kaamch bandh aahe rashan paani paise nahit 3 mule aani wife aani mi total 5 jan kash jagaych punyat

    Reply

Leave a Reply