पुण्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन; राज्यात कार्यकर्ते आक्रमक

काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनाला पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनला पोलिसांची परवानगी दिलेली नव्हती. अर्ज देऊनही पोलिसांनी त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.
देशात दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याने आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे आज अमरावतीत काँग्रेसच्यावतीने अमरावतीच्या इर्विन चौकात धरणे आंदोलन सुरु केले आहेत. इंधन दरवाढीचे फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी इंधनाचे दर कमी करा अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित आहेत.

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज मनमाडमध्ये काँग्रेस तर्फे जनआंदोलन करण्यात आले. आधीच देशातील नागरिक कोरोनामुळे अडचणीत आले असताना केंद्र सरकारने गेल्या 19 दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असताना केंद्र सरकार दरवाढ करीत असल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. केंद्र सरकारच्या अन्यायकारक पिळवणुकी विरोधात काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येऊन सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

Leave a Reply