पोलिसांच्या तपासात २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे आंतरजिल्हा बदली केल्याचे निष्पन्न

नाशिक:-जिल्हा रुग्णालयातून पोलिस कर्मचाऱ्यांना गंभीर आजाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून, ग्रामीण पोलिसांच्या तपासात २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्राद्वारे आंतरजिल्हा बदली केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांच्या प्रमाणपत्रावर अतिरिक्त शल्यचिकित्सक डाॅ. निखिल सैंदाणे, डाॅ. किशोर श्रीवास यांच्या सह्या आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सिव्हिलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याने जिल्हा रुग्णालय आणि पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अधिक्षक सचिन पाटील यांनी याप्रकरणी माहिती दिली.

Leave a Reply