पोलिसांच्या हातावर तुरी देत मोक्का लावलेल्या आरोपी चे पलायन

पुणे :- पुण्यात मोक्का लावलेला आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला आहे.संतोष बाळू पवार असे पोलिसांची नजर चुकवून पळून गेले आरोपीचे नाव आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून संतोष पवारने पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या अंगडियाच्या कार्यालयात जाऊन साथीदारांसह दरोडा टाकला होता.काही दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपींवर मोक्कादेखील दाखल केला होता.संतोष पवार गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत होता. गुन्ह्यातील चौकशीसाठी पोलीस संतोष पवारला काल खानापूर येथील त्याच्या घरी घेऊन गेले होते. त्यावेळी उपस्थितांनी पोलिसांवर हल्ला केला. ही संधी साधत पवारने हातातील बेड्यांसह पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली. पवार याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं स्थापन करण्यात आले आहेत.आरोपी संतोष पवार याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत .

Leave a Reply