प्ले ऑफसाठी दिल्लीला विजयाची गरज; मुंबई खेळणार लीगमध्ये 200 वा सामना

दिल्ली-मुंबई सामना; प्रक्षेपण दु.३.३० वाजेपासून

बंगळुरू-हैदराबाद लढत; प्रक्षेपण संध्या. ७.३० वा.

मुंबई आणि बंगळुरूने आपापले सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्सची टीम प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी उत्सुक आहे. त्यांना प्ले ऑफ गाठण्यासाठी एका विजयाची गरज आहे. त्यांचा शनिवारी दुपारी ३.३० वाजता चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी सामना होईल. मुंबईची टीम आयपीएलमध्ये अापला २०० वा सामना खेळेल. दिल्लीला पात्रता मिळवण्यासाठी क्रमवारीत थोडा बदल करावा लागेल. युवा सलामीवीर पृथ्वी शॉचा अंतिम ११ मध्ये समावेश करावा लागेल. त्याचप्रमाणे वरिष्ठ खेळाडू अजिंक्य राहणेच्या फलंदाजीत बदल करण्याची गरज असून तो या स्पर्धेत आघाडीला येऊन तुफानी फलंदाजी करू शकत नाही. दिल्लीची मोठी अडचण ऋषभ पंत आहे. पंत अद्याप लयीत नाही. तो लयीत येणे आवश्यक आहे. तो सुरुवातीपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. तो फाॅर्मात आला तर दिल्लीसाठी विजय सोपा होईल.

सायंकाळी ७.३० वाजता सनरायझर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम शारजामध्ये समोरासमोर असतील. हैदराबादला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपले दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे, बंगळुरू हा सामना जिंकून प्ले ऑफच्या अंतिम चारमध्ये पोहोचेल. या साऊथ इंडियन डर्बीला जेव्हा सुरुवात होईल, तेव्हा दोन्ही संघांवर समान दबाव असेल. हैदराबादच्या संघाने गत सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला हरवले होते. यष्टिरक्षक फलंदाज साहाच्या पुनरागमनाने अंतिम ११ ची फळी संतुलित बनली.

Leave a Reply