बंदी असलेल्या 200 किलाे मांगूर‎ माशांचे उत्पादन; मासेविक्रेत्यावर गुन्हा‎

नाशिक:-आगरटाकळी येथे राहणारा संशयित ‎किशाेर काशीनाथ आडणे याने‎ रहात्या घरातील पाण्याच्या हौदात‎ २०० ते ३०० किलो मांगूर जातीच्या ‎माशाचे उत्पादन घेतले. त्याच्यावर ‎मत्स्यव्यवसाय विभागाच्या ‎ अधिकाऱ्यांनी कारवाई करीत‎ उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास‎ अधिकारी व्ही. ए. लहारे यांनी‎ दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित‎ असलेले मांगूर जातीच्या माशाचे‎ उत्पादन घेतले जात असल्याची‎ माहिती विभागाला समजली.‎ त्यानुसार पोलिसांच्या सहाय्याने‎ आगरटाकळी येथील संशयित‎ आरोपी किशोर काशिनाथ आडणे‎ याच्या घरी पाण्याच्या हौदेतून २०० ते‎ ३०० किलो मांगूर जातीचे मासे‎ आढळले. याची बाजारात सुमारे १८‎ हजार रुपये किंमत आहे. आडणे हा‎ गेल्या चार ते पाच वर्षापासून मांगूर‎‎ मासेंची विक्री करीत असून ते ओढा‎ आणि एकलहरे परिसरातून खरेदी‎ करीत होता. त्यानंतर नाशिकच्या‎ बुधवार बाजारात त्याची विक्री करीत‎ होता. त्याच्याविराेधात सहायक‎ मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी‎ पी. एस. काळे, गणेश गोसावी,‎ सुदाम झाडे यांनी कारवाई केली.‎ मांगूर हा विदेशी मासा असून ताे‎ अति मांसाहारी आहे. पाण्यातील‎ स्थानिक मासे ताे नष्ट करताे.‎ त्यामुळे नैसर्गिक जैवविविधतेवर‎ त्याचा परिणाम हाेऊशन पर्यावरणाचे‎ संतुलन बिघडते.‎

Leave a Reply