बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:अनन्या पांडेनंतर शाहरुखच्या ‘मन्नत’वर झाली NCB ची चौकशी, अनन्या NCB कार्यालयाच्या दिशेने रवाना

शाहरुख घरी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुरुवारी शाहरुख खान आणि अनन्या पांडे यांच्या घरांवर छापा टाकला. एनसीबीने अनन्याला आज दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावले होते. पण अद्याप ती चौकशीसाठी पोहोचलेली नाही. शाहरुखच्या आधी एनसीबीची टीम छापा टाकण्यासाठी अनन्याच्या घरी पोहोचली होती. अनन्याचे घर वांद्रा येथे आहे. अनन्या पांडे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे.

दुसरीकडे या कारवाईदरम्यान शाहरुख घरी उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.यावेळी शाहरुखच्या घरी छापेमारी झाली नसून केवळ तपासासाठी काही गोष्टी मागितल्याचे एनसीबी डीडी अशोक जैन यांनी माध्यमांना सांगितले आहे.

ड्रग्ज प्रकरणात याचिका फेटाळल्यानंतर तुरुंगात असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आज सकाळी मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला होता. वडील आणि मुलाची ही भेट सुमारे 18 मिनिटांची होती. मात्र, जेल प्रशासन नियमानुसार ही भेट केवळ 10 मिनिटांची असल्याचे सांगत आहे.

आर्यनचे अभिनेत्रीसोबतचे ड्रग चॅट एनसीबीला मिळाले

वृत्तानुसार, एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत. ही नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेच असल्याचे म्हटले जात आहे.

NCB हाती लागलेल्या आर्यनच्या काही चॅटमध्ये तो एका नवोदित अभिनेत्रीसोबत ड्रग्जवर चर्चा करताना दिसतोय. 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले. असेही म्हटले जात आहे की ही अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला सोडून दिले होते.

Leave a Reply