भारताची ऐतिहासिक कामगिरी, 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण, जगभरात डंका

देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे.

मुंबई : देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत.

भारताने रचना इतिहास

एक नवा इतिहास रचून भारताने जगभरात आज डंका वाजवली आहे. या खास दिवशी लाल किल्ला संकुलात आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया हे ऐतिहासिक लसीकरणावरील गाणे आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहेत. भारत सरकारच्या कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 100 कोटी डोस देण्यात आले आहेत.

75% प्रौढांचे लसीकरण

विशेष म्हणजे 75% सर्व प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. 100 कोटी डोसचे लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल देशामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशभरात 100 स्मारके तिरंग्याने प्रकाशित करण्याची देखील योजना आहे. लाल किल्ल्यावर 225 फूट लांब तिरंगा फडकवला जाईल. त्याचे वजन सुमारे 1400 किलो आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आणि मोठा आहे. यापूर्वी चीन हा एकमेव देश आहे, ज्याने 100 कोटींपेक्षा जास्त लस डोस दिले आहेत.

आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी यापूर्वी सांगितले होते की 100 कोटी डोस दिल्यानंतर, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना लवकरच दुसरा डोस देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे देशातील 75 टक्के प्रौढांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लोकसंख्येच्या 31 टक्के लोकांनी दुसरा डोस देखील घेतला आहे.

Leave a Reply