मकर संक्रांत निमित्त हलव्याच्या दागिन्यांनी नाशिकची बाजारपेठ सजली

मकर संक्रांत म्हटले की नात्यातली कटुता बाजूला सारून नात्यांची नव्याने सुरुवात करण्याचा सण. तिळगुळातला गोडवा नात्यात विरघळून त्याला आणखी मधुर करण्याचा सण. म्हणून संक्रांत सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने जवाई, गरोदर स्त्रिया, नवजात बाळ आणि नववधूंना तिळगुळाचे बनवलेले हलव्याचे दागिने घेऊन आपुलकी आणि प्रेम जपले जात आहे.

नाशिक – मकर संक्रांत म्हटले की नात्यातली कटुता बाजूला सारून नात्यांची नव्याने सुरुवात करण्याचा सण. तिळगुळातला गोडवा नात्यात विरघळून त्याला आणखी मधुर करण्याचा सण. म्हणून संक्रांत सण साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने जवाई, गरोदर स्त्रिया, नवजात बाळ आणि नववधूंना तिळगुळाचे बनवलेले हलव्याचे दागिने घेऊन आपुलकी आणि प्रेम जपले जात आहे.

हलव्याच्या दागिन्यांना कृत्रिम फुलांचा साज…

संक्रांतीला काही दिवस बाकी असताना नाशिक शहरातील सर्वच बाजारपेठ हलव्याच्या दागिन्यांनी सजलेल्या आहेत. तसा कोरोनाचा प्रादुर्भाव या सणावर देखील कायम आहे. मात्र, तरीही आपली सुन, जवाई आणि घरातील बालकांना भेट देण्यासाठी हलव्याचे दागिने खरेदी करण्याचा नाशिककरांचा उत्साह तसाच असल्याचे बघायला मिळत आहे. यंदा पारंपारिक हलव्याच्या दागिन्यांना कृत्रिम फुलांचा साज चढवण्यात आल्याने पारंपारिकतेसोबतच आधुनिकताही जोपासली जात आहे.

कोरोनामुळे कमी किमतीच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती…

या वर्षी मकरसंक्रांतीला कोरोनाचे सावट असून ग्राहक कमी किमतीचे हलव्याचे दागिने खरेदी करण्यास पसंती देत आहेत. हलव्याचे एकूण वीस प्रकारचे दागिने बनविले जातात. हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुरमुरे, खसखस, साबुदाणा, काजू, पत्री खडी साखर, शेंगदाणा, बडीशेप, तांदूळ, लवंग, मसूरडाळ यांचा वापर करून हलवा बनवला जातो. व आकर्षक दागिने तयार केले जातात. एका दिवसात एकच दागिन्यांचा हार बनविला जात असल्याचे वृषाली शौचे यांनी सांगितले.

Leave a Reply