मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका

मुंबई:-आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे राज्यभर दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, बाळा नांदगावकर यांनी दिली.

Leave a Reply